-->
शरद पवार यांच्या हस्ते बारामती पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचा उदघाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

शरद पवार यांच्या हस्ते बारामती पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचा उदघाटन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

बारामती: बारामती पंचायत समितीचे उदघाटन आज शरद पवार यांच्या शुभहस्ते पार पडले. 
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, निर्मला पानसरे, ग्रामविकास मुख्य सचिव राजेश कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
        उदघाटन झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रम बोलताना शरद पवार म्हणाले की,  कोणत्याही संस्था या नेटक्या व स्वच्छ कारभार करत लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल असे काम करणाऱ्या असाव्यात असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. 
         पवार पुढे म्हणाले, राज्याच्या अनेक भागातून वेगवेगळ्या प्रशासकीय इमारतींसाठी माझ्याकडे अनेक लोक येत असतात. नूतन इमारतीची मागणी करताना बारामतीमध्ये जशी इमारत आहे तशी इमारत आम्हाला द्या. असे आवर्जून सांगतात. आज बारामती पंचायत समितीची इमारत पाहिल्यानंतर या बारामती पॅटर्नची माझी खात्री पटली. अशी इमारत पाहिल्यानंतर आगामी पंचायत समितीची निवडणूक ही सोपी असणार नाही. कारण प्रत्येकालाच इथे येण्याचा मोह होणार आहे.

       बारामती मध्ये सुरू असणाऱ्या विकासकामांच्या प्रकल्पांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी  माहिती दिली.  बारामतीसाठी अनेक प्रकल्प योजना नियोजित आहेत. त्या सर्व नियोजित कामांचे नियोजन या ठिकाणी सांगणार नाही. नाही तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणतील की, अजित पवार हा फक्त बारामतीचा अर्थमंत्री आहेत काय? 

      अजितदादा पुढे म्हणाले की, आज पर्यंत बारामतीतील अनेक विरोधकांनी जिरायत पट्ट्यातील पाणी प्रश्नावरुन राजकारण करत रान पेटवले. आगामी काळात जिरायत पट्ट्यातील पाणी योजना पूर्ण करून पन्नास वर्षापासून  असलेला पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.  त्यामुळे येथून पुढे कोणी तुम्हाला पाणी मिळालं का असं सांगायला येणार नाही.

       मी ग्रामविकास मंत्री असताना माझ्या खात्याअंतर्गत बारामती पंचायत समितीसारखी इमारत उभी राहिली याचा मला अभिमान वाटत असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.

    लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांसाठी नगरोत्थान सारखी योजना आगामी अर्थसंकल्पात आणावी यासाठी आम्ही ग्रामविकास विभागातर्फे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांना प्रस्ताव देणार आहोत.                     पंचायत समिती ही कार्यकर्ते घडवणारी शाळा आहे. बारामती पंचायत समितीची इमारत पाहून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बारामती मधून इच्छुकांची संख्या वाढणार, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कसोटी लागेल, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article