
कुरणेवाडी येथे छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाण आयोजित शिवजयंती उत्साहात
Sunday, February 20, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथे छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाण आयोजित शिवजयंती सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन श्री. संदीप पाटील जगताप अध्यक्ष बारामती तालुका दूध संघ, सरपंच श्री. संग्राम कोकरे, श्री. गणेश काळभोर, प्रा.श्री.हिराचंद काळभोर, श्री. किसन काळभोर, श्री. विश्वास काळभोर, श्री.अरविंद शिंदे, श्री. हनुमंत काळभोर, श्री. हेमंत शितोळे व श्री.दीपक डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवजयंती निमित्ताने छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठाण कडून गोल्ड मेडलिस्ट ऍक्टर सुभाष यादव यांचा महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला होता याला गावातील महिला व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.
यावेळी विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष संतोष आप्पा काळभोर, शरद काळभोर, प्रवीण काळभोर, अभिजित काळभोर, राहुल शिंदे, सचिननाना काळभोर, अतुल काळभोर, गणेश(भाऊ)काळभोर, विक्रम काळभोर, प्रमोद काळभोर, समीर शिंदे, मयुर शेडगे व सर्व प्रतिष्ठाण मधील कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते.