
सिंधुदुर्ग ते वाघळवाडी ३५० किलोमीटर अंतर कापत आणि रक्तदान शिबिर, ग्रामस्थांसाठी डोळे तपासणी असे समाजिक उपक्रम राबवत वाघळवाडी'त मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी
Monday, February 21, 2022
Edit
रक्तदान शिबिर, ग्रामस्थांसाठी डोळे तपासणी असे सामाजिक उपक्रम राबवत वाघळवाडी येथे अंबामाता ग्रामस्थ मंडळाने वाघळवाडी ते सिंधदुर्ग किल्ले असे साडेतीनशे किलोमीटर अंतर कापत कार्यकर्त्यांनी शिवज्योत आणून शिवजयंती उत्सव साजरा केला.
वाघळवाडी येथे सर्व तरुण कार्यकर्त्यासह ,ग्रामस्थ, महिला शिवजयंती निमित्त एकत्र येऊन शिवजयंती साजरी करत असतात. गावापासून साडेतीनशे किलोमीटर अंतर असलेल्या सिंधदुर्ग किल्ल्यावरून अवघ्या ४२ तासात रात्र-दिवस धावत अवघ्या २२ कार्यकर्त्यांनी शिवज्योत वाघळवाडी गावात आणली. दरम्यान निरा ते सोमेश्वर कारखाना येथील अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार घालून वाघळवाडी पर्यंत दुचाकी चारचाकी गाडयावरून बाईक रॅली काढण्यात आली होती.यात तरुण, मुली, महिला, ज्येष्ठ ग्रामस्थ सहभागी झाले होते. गावात शिवज्योतीचे आगमन होताच महिलांनी ठीक-ठिकाणी ज्योतीचे पूजन करत स्वागत केले. गावात ज्योतिच्या स्वागतासाठी घराच्या पुढे रांगोळी काढण्यात आल्या होत्या.
तसेच संध्याकाळी गावात प्रदिक्षणा घालून शिव ज्योतीची मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात काढण्यात आली होती.
शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी अक्षय ब्लड बँक'च्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यासह परिसरातील नागरिकांनी रक्तदान करत १०२ जणांनी रक्तदान उपक्रमात सहभाग नोंदवला.तसेच के के आय बुधराणी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले यात दोनशे हुन अधिक नागरिकांनी डोळे तपासणी केली असून त्यांना चष्मे अल्पदरात मिळणार आहेत.
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आल्याने, सोमेश्वर कारखान्याने , ग्रामपंचयतीने तसेच पोलिस प्रशासनाने उत्सवास सहकार्य केल्याने त्यांचे अंबामाता मंदिराच्या प्रागणात मंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांनी आभार मानले.