निवडणुकीत माहिती लपवल्या प्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा
Friday, February 11, 2022
Edit
राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा (two months rigorous imprisonment) सुनावली आहे.
चांदूरबाजार (Chandur bazar) प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत (2014 Maharashtra Assembly Elections) मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती लपवणं बच्चू कडूंना महागात पडल्याची चर्चा आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे (Gopal Tirmare) यांनी 2017 मध्या बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती. बच्चू कडू यांनी मुंबईत 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणुकीवेळी या फ्लॅटबद्दलची माहिती निवडणूक आयोगाला दिली नाही, असा आरोप बच्चू कडूंवर होता.
याच आरोपांवरुन 2017 मध्ये कडूंविरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वे गुन्हा दाखल झाला होता. बच्चू कडू यांच्याविरोधात या प्रकरणी तक्रार करणारे तत्कालीन नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वे संबंधित यंत्रणेकडून माहिती मिळवली होती. त्यातून हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. (रवीना टंडनच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर) दरम्यान, बच्चू कडू यांनी त्यावेळी या प्रकरणातील सर्वा आरोप फेटाळले होते.
राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते. त्यासाठी बँकेचे 40 लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते. पण कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांच्या आधी ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडूंनी त्यावेळी केला होता. त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे होते, असं स्पष्टीकरण बच्चू कडूंनी 2017 मध्ये केलं होतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांनी मुंबईत म्हाडाच्या यत्रणेकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत फ्लॅट विकत घेतला होता. बच्चू कडूंनी 19 एप्रिल 2011 रोजी त्या फ्लॅटचा ताबा घेतला होता. त्यानंतर बच्चू कडूंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी मुंबईतील त्या मालमत्तेविषयी माहिती निवडणूक आयोगाला देणे टाळले होते. त्याच गोष्टीचा धागा पकडत तक्रारदारांनी बच्चू कडूंकडून आयोगाची दिशाभूल झाल्याचा ठपका ठेवत तक्रार केली होती. या प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.