
शिवजयंती निमित्त राजगड, तोरणा व शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
Thursday, February 17, 2022
Edit
पुणे, दि. १७: जिल्ह्यातील राजगड, तोरणा व शिवनेरी या किल्ल्यांवर शिवजयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थ, पंचायत समिती तसेच गावस्तरावरील कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, तरुण मंडळे आदींच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
मोहिमेअंतर्गत प्रथम टप्प्यात या तीन किल्ल्यांवर शिवजयंतीच्या १९ फेब्रुवारी रोजी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे तसेच शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यात येत असून याकरीता पुणे येथील पुरातत्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.