-->
निरा-बारामती रस्त्यावर दुचाकी झाडाला धडकून १७ वर्षीय शालेय विद्यार्थी ठार तर एक जण गंभीर जखमी

निरा-बारामती रस्त्यावर दुचाकी झाडाला धडकून १७ वर्षीय शालेय विद्यार्थी ठार तर एक जण गंभीर जखमी

नीरा-बारामती या राज्य मार्गावर शुक्रवारी (दि. ४) मोटारसायकल झाडावर आढळून झालेल्या अपघातात प्रथमेश नामदेव गायकवाड (वय १७, रा. सोरटेवाडी, ता. बारामती) या शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर मयुर हिंदुराव सोरटे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
       प्रथमेश गायकवाड शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता सहा फाटा येथे ही घटना घडली. याबाबत नामदेव महादेव गायकवाड यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या करंजेपुल चौकीत अपघाताची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, प्रथमेश गायकवाड व मयूर सोरटे हे दोन्ही विद्यार्थी सकाळी आपल्या दुचाकीवरून खासगी शिकवणीला निघाले होते. शाळेत जात असताना त्यांची दुचाकी झाडावर धडकल्याने अपघात झाला.
        या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना सोमेश्वर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले असता डॉक्टरांनी प्रथमेश गायकवाड याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषीत केले. तर मयूर सोरटे हा जखमी असल्याने त्याच्यावर उपचार आहेत. या घटनेचा तपास वडगाव निंबाळकर पोलिस करत आहेत.
        प्रथमेश गायकवाड

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article