
खोमणेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी कल्याण माळशिकारे तर व्हा.चेअरमनपदी दिलीप साबळे
Friday, February 11, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील खोमणेवाडी विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी कल्याण सुरेश माळशिकारे यांची तर व्हा.चेअरमनपदी दिलीप बापुराव साबळे यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी धाईतोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूकीत चेअरमनपदासाठी एकमेव कल्याण माळशिकारे यांनी तर व्हा.चेअरमनपदासाठी दिलीप साबळे यांचाच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन कल्याण माळशिकारे यांनी सांगितले की, मागील काळात संस्था तोट्यात होती परंतु येणाऱ्या काळात तोटा भरून काढून सभासदांना लाभांश देण्याचा मानस आहे.