-->
पुन्हा एकदा बारामती तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; माळेगाव येथे भरदिवसा घरफोडी करत लुटला ८.७५ लाखांचा ऐवज

पुन्हा एकदा बारामती तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; माळेगाव येथे भरदिवसा घरफोडी करत लुटला ८.७५ लाखांचा ऐवज

भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पावणे नऊ लाख रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना अमरसिंह कॉलनी माळेगाव येथे दि.२२ रोजी दुपारी दोन ते साडेआठ दरम्यान घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

        याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विनोद दत्तात्रय चांडवले ( वय-३० वर्षे, फ्लॅट नं. ७ झगडे रेसिडेन्सी अमरसिंह कॉलनी माळेगाव ता. बारामती ) हे फ्लॅट बंद करून नातेवाईकांच्या कार्यक्रमाला गेले होते. अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून रोख रक्कम सात हजार रुपयांसह नऊ लाख रुपयांचे दागिने चोरले. या चोरीचा तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.

        दरम्यान सदर घरफोडीची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सुचना केल्या. तसेच पुणे येथून फिंगरप्रिंट टीमला देखील पाचारण करण्यात आले आहे. सदर चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article