
वडगांव निंबाळकर: शिवाकाका कारंडे फौंडेशन मार्फत रायगड रिसॉर्ट वर शिवजयंती उत्साहात साजरी
Sunday, February 20, 2022
Edit
बारामती :वडगाव निंबाळकर @प्रतिनिधी-सुनील जाधव वडगाव निंबाळकर नजीक होळ रोड रायगड रिसॉर्ट, इनामवस्ती सदोबाचीवाडी या ठिकाणी शिवाकाका कारंडे फौंडेशन मार्फत शिवजयंती उत्सवा निमित्त भाषण स्पर्धा व व्यखानाचे आयोजन करण्यात आले.
शिवकालीन जीवन शैली व आहार शास्त्र या विषयावर व्याख्यान देण्यासाठी कर्नाटक रत्नश्री (वैद्य) पुरस्कार प्राप्त डॉ. महादेव पाटील,निपानी येथून आले होते.
त्यांनी प्रामुख्याने पाश्चात्य आहारसौंस्कृतीच्या आहारी जाऊन हजारो वर्षापासून हिंदुस्तानीआहार सौस्कृतीचा भाग असलेले अन्न घटक जसे की विषारी तननाशक-कीटक नाशक तसेच रासायनिक खता शिवाय पिकवलेल्या देशी जातीचे अन्न धान्य व फळभाज्या,गूळ, काळे -खडे मीठ,देशी गाईचे ताक-दूध,लाकडी घण्याचे शुद्ध तेल,ज्वारी-बाजरी-नाचणीची भाकरी,मातीच्या व तांब्या-पीलळच्या भांड्यांचा वापर यांच्या केलेल्या त्यागामुळेच गेल्या पन्नास वर्षांपासून मधुमेह, उच्च रक्त दाब,ह्रदय विकार, किडनी चे विकार अश्या असंख्य रोगांना आपण आमंत्रण दिले आहे,
त्यामुळे आज शिवजयंती दिवशी स्टील, जर्मन भांडी, हायब्रिड बियाणे, गव्हांची चपाती, चहा पिकांवर रासायनिक खते,रिफाईंड तेल,अलोपॅथिक औषधे अश्या हिंदुस्थानी आहार सौस्कृतीचा भाग नसलेल्या गोष्टींचा त्याग करण्याचे आवाहन केले.
डॉ.महादेव पाटील साहेबांचा सत्कार नथुअण्णा पाटील बुवा गीते विविध कार्यकारी सोसायटी चे व्यवस्थापक श्री मनोहर कारंडे, यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच भाषण स्पर्धेसाठी ग्रामपंचायत होळ, सदोबाचीवाडी व सस्तेवाडी येथील सर्व प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा सोरटेवाडी-करंजे, आनंद विद्यालय दहा फाटा,सह्याद्री इंग्लिश मेडीम स्कूल, विद्याप्रतिष्ठान मध्ये शिकणाऱ्या बालमित्रांनी मोठ्या संख्येने सहभागी नोंदवला होता.
स्पर्धेसाठी प्रमुख परीक्षक मनुन मा.कृषी अधिकारी ,पुणे श्री जोशी साहेब लाभले ज्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आले.