-->
कोऱ्हाळे येथील ६ ऊसतोड मजुरांचे २७ हजार रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी पळवले

कोऱ्हाळे येथील ६ ऊसतोड मजुरांचे २७ हजार रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी पळवले

 कोऱ्हाळे बु - कोऱ्हाळे बु।। ता.बारामती जि.पुणे या गावचे हददीतील बाबुराव माळशिकारे यांचे शेतात त्यांचे मालकीचे शेतात  सिध्दार्थ कडोबा वाघ यांचा स्वतःचा तसेच त्यांच्या सोबत ऊसतोड कामगार टोळीतील इतर 5 कामगारांचे मोबाईल दिनांक 11/02/2022 रोजी रात्रौ 11.30 वा ते दिनांक 12/02/2022 रोजीचे पहाटे 05.00 वा.चे दरम्यान  सर्वजण झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने आमचे संमतीशिवाय, मुद्दाम लबाडीचे सर्वांचे कोपीत ठेवलेले 27,000/- रू किमतीचे एकुण 06 मोबाईल चोरुन नेलेले असल्याने सिद्धार्थ वाघ यांनी अज्ञात चोरटयाविरूद्ध कायदेशिर फिर्याद दिली आहे.
   चोरीस गेलेल्या मोबाईलचा तपशील     
  1) 10,000/- जु.वा.किं.अ टेक्नो कंपनीचा स्पार्क मॉडेलचा त्यामध्ये मो 9022135197 क्र जीओ कंपनीचे सीम असलेला निखील सिध्दार्थ वाघ याचे मालकीचा मोबाईल 
2) 8,800/- जु.वा.किं.अ रेडमी कंपनीचा एम आय 9 मॉडेलचा त्यामध्ये मो 9373748136 क्रमांकाचे जीओ कंपनीचे सीमकार्ड व 868384053911599 असा IMEI क्र असलेला राहुल सर्जेराव  जोगदंडे याचे मालकीचा मोबाईल 
3) 6,500/- जु.वा.किं.अ होनोर कंपनीचा हाईट 9 मॉडेलचा त्यामध्ये मो 9766348862 क्रमांकाचे जीओ कंपनीचे सीमकार्ड असलेला आकाश रघुनाथ आढाव याचे मालकीचा मोबाईल 
4) 600/-   जु.वा.किं.अ जिओ कंपनीचा मो.क्र.8830812636 असलेला बाळु महादु साळवे याचे मालकीचा साधा मोबाईल
5) 600/-   जु.वा.किं.अ जिओ कंपनीचा मो.क्र.7499770054 असलेला कैलास भाउराव जोगदंडे याचे  मालकीचा साधा मोबाईल
6) 500/-   जु.वा.किं.अ चायना कंपनीचा त्यात वोडाफोन कंपनीचा मो.क्र.7875416958 असलेला  रावसाहेब कडोबा वाघ याचे मालकीचा साधा मोबाईल 
          एकूण 27,000/-  रुपयांचे एकुण 06 मोबाईल चोरीला गेल्याने वडगांव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला  असून गुन्ह्याचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा.हु.कोर्टास रवाना करुन गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article