
४० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या २ पोलिसांवर एसीबीकडून गुन्हा दाखल
Thursday, February 24, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी ४० हजारांच्या लाचेची मागणी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या 2 कर्मचारी यांनी 40 हजार रुपयांची लाच मगितल्याची एका व्यक्तीने तक्रार केली होती. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील २ पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हवालदार शिवाजी सातव (वय ५२) व पोलिस नाईक गोपाळ जाधव (वय ३५) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार व त्याच्या कुटुंबियांविरोधात वडगाव पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे आली होती.
या तक्रारीची सत्यता तपासून पडताळणी केली असता या गुन्ह्याचा तपास गोपाळ जाधव यांच्याकडे असल्याचे दिसून आले. तक्रादारांना अटक न करण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी या दोघांनी त्यांच्याकडे २५ हजार रुपये व चौकीसाठी प्रिंटर घेण्यासाठी १५ हजार रुपये अशा ४० हजारांच्या लाचेची मागणी केली.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर अधिक्षक सूरज सातव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.