
दारू पिऊन रस्त्याने वेडीवाकडी गाडी चालवणे पडले महागात; पवईमाळ येथील २८ वर्षीय युवकावर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Thursday, February 17, 2022
Edit
पणदरे - 17/ 2 /2022 रोजी दुपारी 02/00 वाजेच्या सुमारास बारामती - नीरा रोडवर आरोपी सागर शिवाजी कांबळे वय 28 वर्षे राहणार पवईमाळ तालुका बारामती जिल्हा पुणे त्याचे ताब्यातील मोटरसायकल नंबर एम एच 42 ए झेड 1718 हा वेडावाकडा चालवित घेवून येत असताना दिसल्याने आम्ही त्याची गाडी थांबवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले सागर शिवाजी कांबळे वय 28 वर्षे राहणार पवईमाळ तालुका बारामती जिल्हा पुणे असे सांगितले.
त्यांचे तोंडाचा आंबट व उग्र वास येत असल्याने त्यास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन ला घेवून आलो. त्यानंतर त्याची मा. वैद्यकीय अधिकारी सो, प्राथमिक आरोग्य केंद्र पणदरे यांचे कडून वैद्यकीय तपासणी केली असता तो मादक द्रव्याचे (दारूचे) सेवन केल्याने सर्टीफिकेट दिले आहे.
म्हणून गोपाल नामदेव जाधव बक्कल नंबर 2513 नेमणूक वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन यांनी सागर शिवाजी कांबळे वय 28 वर्षे राहणार पवईमाळ तालुका बारामती जिल्हा पुणे याचे विरूध्द मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे फिर्याद दिली आहे.
गुन्हा रजि दाखल करुन दाखल गुन्ह्याचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा.हु.कोर्टास रवाना करुन गुन्ह्याचा पुढील तपास
पो.ना.खोमणे हे करीत आहेत.