
फलटण: गॅलेक्सी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. फलटण चा वैविध्यपूर्ण हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न
Thursday, February 17, 2022
Edit
फलटण - सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या गॅलेक्सी को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या माननीय संचालिका सौ सुजाता सचिन यादव यांच्या संकल्पनेतून सोसायटीतर्फे वैविध्यपूर्ण हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सौ सुजाता यादव यांचा दांडगा लोकसंपर्क यावेळी दिसून आला, 1 दिवसात आयोजित केलेल्या या समारंभास सुमारे 850 महिला यांनी दिवसभरात उपस्तिथी दर्शविली, यावरून या हळदीकुंकू कार्यक्रमाची व्याप्ती दिसून आली. महत्वाचे म्हणजे प्रत्येकास मास्क, सॅनिटायजर ची छोटी बॉटल देण्याची देखील सोसायटीच्या तर्फे काळजी घेण्यात आली होती, तसेच करकरं हा दिवसभर असल्यामुळे गर्दी होऊच नये याचीही यशस्वीपणे काळजी घेण्यात आली होती.
या हळदीकुंकू च्या कार्यक्रमास आलेल्या महिलांना पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी तुळशी चे छानसे रोपटे बॅग मध्ये घालून देण्यात आले होते, जेणेकरून ते महिलांना घरी घेऊन जायला अडचण आली नाही, अश्या बारीकसारीक गोष्टींची देखील संचालिका सौ सुजाता सचिन यादव यांच्यातर्फे घेण्यात आली होती, तसेच यावेळी उपस्तिथ महिलांना व गॅलेक्सी च्या ग्राहकांना बारामती व फलटण येथील सुप्रसिद्ध ज्योतीचंद भाईचंबद सराफ जे.बी.एस तर्फे मजुरीवर घसघशीत अशी २० टक्के सूट चे कुंपण, तसेच ब्रम्हा हॉटेल तर्फे कुटुंबास १० टक्के सूट, फर्स्ट लेडी तर्फे १० ℅ ते ३०% सूट चे कुंपण देण्यात आले.
तसेच रथसप्तमी ते ८ मार्च या महिला दिन पर्यंत महिलांसाठी ठेवींवर ५ ग्राम चांदीचे नाणे देण्याची देखील घोषणा सौ सुजाता यादव यांच्यातर्फ़े करण्यात आली.
हळदीकुंकू ची प्रथा जोपासण्यासोबत कार्यक्रमाचे आयोजन व वैविध्यपूर्ण संकल्पना राबवून महिलांना दिलेले वाण व सुविधा पाहून या कार्यक्रमाची महिला वर्ग स्तुती करत होता.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन होण्यामध्ये सौ सुजाता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत सौ कांचन, सौ वनिता मॅडम, सौ माधुरी, निकिता व माधवी मॅडम यांचाही मोलाचा वाटा होता.