
घराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने कर्वे यांचा मृतदेह तब्बल ३ तास ग्रामपंचायतीपुढे; अखेर ग्रामपंचायतीने पोलीस स्टेशनला पत्र दिल्याने तणाव निवळत दुपारी २ च्या दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Monday, February 21, 2022
Edit
कोऱ्हाळे बु : बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील बिंटू कर्वे यांच्या घराकडे जाणारा रस्ता खुला व्हावा या मागणीसाठी मृतदेह ग्रामपंचायत समोर ठेवण्यात आला होता. घटनास्थळी वडगांव निंबाळकर पोलीसांनी मध्यस्थी केल्यामुळे तणाव निवळला व प्रचंड तणावानंतर अखेर ग्रामपंचायतीने रस्ता खुला करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र दिल्याने निलेश कर्वे यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी नेण्यात आला.
थोपटेवाडी येथील निलेश बिंटू कर्वे (वय 23) यांचे आजारपणामुळे सोमवारी पहाटे ३ वाजता फलटण येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
बिंटू कर्वे यांचे कुटुंब येथिल बनाजीनगर परिसरात राहते त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता कंपाउड टाकुन आडवला आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन पंचायत समिती आणि तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. याबाबत योग्य ती कारवाई झाली नसल्यामुळे कर्वे कुटुंबाला आपल्यावर अन्याय झाला अशी भावना झाली होती.
ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्त मागविण्यासाठी उशीर केला त्यामुळे तणावात आणखी वाढ झाली अखेर मृतदेह ग्रामपंचायतीच्या समोर नेण्यात आला. पंचायत समितीचे अधिकारी घटनास्थळी दाखल होताच वाद आणखी चिघळला या सर्व घटनेला हेच सर्वजण जबाबदार आहेत असे म्हणत अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
अन्याय झाल्याच्या भावनेतुन आजारपणामुळे निधन झाले असे कर्वे कुटुंबियांचे मत आहे, यामुळे त्यांनी तरुणाचा मृतदेह रुग्णवाहिकेतून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणला आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा असा सवाल उपलब्ध केला सुमारे तीन तास मृतदेह थोपटेवाडी ग्रामपंचायतीच्या पुढे ठेवण्यात आला होता.
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रेय खंडाळे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पंचायत समितीचे गटनेते प्रदीप धापटे यांनी घटनास्थळी उपस्थित होते. अखेर ग्रामपंचायतीने पोलिस बंदोबस्त मागण्याचा पत्र दिले त्यामुळे तणाव निवळला व दुपारी दुःखद वातावरणात दुपारी २ च्या दरम्यान मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी युवकाला मदत केली होती. २४ फेब्रुवारीला रस्ता काढून देण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीने १२/४/२१ रोजी रस्ता खुला होण्यासाठी तहसीलदार यांना पत्र दिले होते त्यावर तहसीलदार यांनी ३१/८/२१ रोजी ग्रामपंचायतीला व पोलीस स्टेशनला कंपाउंड काढण्याचा आदेश दिला होता. ४ महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनने ग्रामपंचायतीला पत्र देऊन किती तारखेला बंदोबस्त हवा आहे व स्टाफ किती पाहिजे याचे पत्र दिले आहे. होते परंतु ग्रामपंचायतीने बंदोबस्त मागविण्यासाठी पोलीस स्टेशनला कोणतेही पत्र दिले नाही त्यामुळे निलेश कर्वे मानसिक तणावात होते व त्या त्रासातूनच त्यांचा मृत्यू झाला असे त्यांच्या व घरच्यांनी नातेवाईकांनी सांगितले.
हा रस्ता खुला करण्यासाठी ग्रामपंचायतीनेच सहा महिन्यांपूर्वी तहसीलदारांना पत्र दिले होते. कर्वे कुटुंबाला जवळचा दुसरा रस्ता उपलब्ध करून देत त्यावर २ लाख २० हजारांचा निधी टाकला आहे. परंतु विरोधक विरोधासाठी विरोध करत असल्याने व सदर जागा गायरान असल्याने रस्त्याची नोंद नाही त्यामुळे हा रस्ता होत नाही अशी प्रतिक्रिया उपसरपंच कल्याण गावडे यांनी दिली.
गायरान गट क्र.१२० मध्ये अतिक्रमण करून गेट घातल्याने हा वाद निर्माण झाला होता. कर्वे यांनी दिलेल्या अर्जावर तहसीलदार यांनी आदेश काढून रस्ता काढण्यासाठी पोलीस पोलीस स्टेशनला बंदोबस्त देण्यासाठी आदेश दिले होते.पोलीस स्टेशनकडून ग्रामपंचायतीला किती तारखेला व कसा बंदोबस्त हवा आहे यासाठी पत्र दिले होते. यावर ४ महिने उलटून देखील ग्रामपंचायतीकडून कोणतेही पत्र न आले नाही असे वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले.