
कुरणेवाडी वि. का. संस्थेच्या चेअरमनपदी शशिकांत काळभोर तर व्हा. चेरअमनपदी संगीता भेलके
Monday, February 14, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील कुरणेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी श्री.शशिकांत(आण्णा)वामनराव काळभोर व व्हाईस चेरअमन पदी सौ संगीता संपत भेलके यांची बिनविरोध
निवड झाली.
यावेळी संस्थेचे सचिव आनंदराव माने, निवडणूक निर्णय अधिकारी ए.आर.जाधव, सरपंच संग्राम कोकरे, गणेश काळभोर, दीपक कोकरे, संतोष काळभोर, संपत भेलके, संजय काळभोर, मामा पिंगळे व प्रविण काळभोर उपस्थित होते.
बिनविरोध निवड झालेले उमेदवार
श्री. सूर्यकांत आण्णा काळभोर, श्री.गोपीचंद शेडगे,
सौ.पूनम दीपक डांगे, संजय चंद्रकांत खलाटे, सौ राजश्री विठ्ठल खलाटे, श्री.अर्जुन कुंडलिक चव्हाण, श्री.दिलीप ज्ञानेश्वर जाधव, श्री.शशिकांत नामदेव पिंगळे, सौ.लताबाई कुंडलिक पिंगळे