
मुरूम संस्थेच्या निवडणुकीत श्री मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनलचा मोठा विजय; १३/० ने श्री मल्लिकार्जुन विकास पॅनेलवर मात
Sunday, February 13, 2022
Edit
सोमेश्वरनगर - श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप व माजी चेअरमन व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे यांनी मुरूम येथील मुरूम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मनापासून लक्ष घातले होते.
आज दि.13 रोजी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. निवडणुकीत ८१० मतदारांपैकी ७७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत राजवर्धन शिंदे यांच्या पॅनेलच्या श्री मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनेलने व पुरुषोत्तम जगताप यांच्या श्री मल्लिकार्जुन विकास पॅनेलचा १३ विरूध्द 0 असा मोठा पराभव करत विजय संपादन केला.
मुरूम सोसायटीच्या निवडणुकीत दोन्हीही पॅनेल मध्ये जोरदार लढत पाहायला मिळाली. दोन्हीही बाजूकडील प्रचार प्रमुख व उमेदवारांनी मागील आठ दिवसांपासून धुमधडाक्यात प्रचार करत मतदारांना आमच्याच पक्षाला मतदान करण्याचे आव्हान केले होते. मतदारराजाने राजवर्धन शिंदे यांच्या पॅनेलवर विश्वास दाखवत मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले.
निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार खालीलप्रमाणे
निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे यांनी मतदान पार पडल्यानंतर निकाल जाहीर केला. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.