
उद्या शरद पवार यांच्या हस्ते होणार बारामती पंचायत समितीचे उद्घाटन; कार्यक्रमास राज्यातील अनेक दिग्गज नेते राहणार उपस्थित
Friday, February 18, 2022
Edit
बारामती : भिगवण रोडलगत जुनी इमारत पाडून तिच्या पाठीमागे नव्याने उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य सुसज्ज अशा बारामती पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवार दि.१९ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पंचायत समितीचे उद्घाटन पदमविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रमुख उपस्थिती म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुप्रिया सुळेराज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार रोहित पवार, निर्मला पानसरे, ग्रामविकास मुख्य सचिव राजेश कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती पंचायत समितीने दिली.