
तरडोली येथील पाझर तलाव पाण्याअभावी आटु लागलाने शेतकरी चिंतेत; तलावात पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करणार - भाजपा तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे
Monday, February 28, 2022
Edit
मोरगाव : तरडोली ता. बारामती येथील पाझर तलाव पाण्याअभावी आटु लागला असल्याने या भागातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. उभी पिकं जळु लागली असल्याने भाजपाचे तालुकाध्यक्ष पांडरंग कचरे यांनी बाधीत शेतकऱ्यांची भेट घेऊन तलावात पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
तरडोली पाझर तलावावर तरडोली, मासाळवाडी, माळवाडी, बाबुर्डी, मोरगांव (काही भाग) या गावांच्या नळपाणी योजना अवलंबून आहे. तर तलावातील पाण्यावर परीसरातील सहा गावातील विहरीची पाणी पातळी अवलंबून आहेत. गतवर्षीही पाऊस कमी प्रमाणात पडला असल्याने तलाव पुर्ण क्षमतेने भरला नव्हता. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तलावात पाण्याची केवळ डबकी उरली आहेत. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांची भेट भाजपाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद देवकाते यांनी घेतली यावेळी अनुसुचित जाती जमातीचे जिल्हा सरचीटणीस रवींद्र साळवे, बाळासाहेब भापकर, दत्ता लोणकर व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
तलावात पुरंदर उपसा सिंचनचे पाणी सोडण्यासाठी शासन दप्तरी प्रयत्न करणार असल्याचे कचरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले . तसेच कंपनी सीएसआर फंडातुन निधी मिळाल्यास येथिल पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.