-->
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व IPL Agrotech यांच्यावतीने ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व IPL Agrotech यांच्यावतीने ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक

कोऱ्हाळे बु- महाराष्ट्र शासन कृषीविभाग व आय. पी. एल. अॅग्रोटेक (सोमेश्वरगगर) यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार दिनांक २५/०२/२०२२ रोजी बारामती तालुक्यातील  कोऱ्हाळे बु (पेशवे वस्ती) येथे ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक पार पडले. चातक इनोव्हेशन(इस्लामूर) ने विकसित केलेले हे कृषी ड्रोन एक मानव रहित हवाई वाहन आहे, जे कृषी निविष्ठांची फवारणी,पीक उत्पादन वाढवण्यासाठी आणि पिकांच्या वाढीसाठी वापरले जाते.              ड्रोनमुळे शेतकऱ्यांना मोठ्या खर्चात बचत, वर्धित कार्यक्षमता आणि अधिक नफा देऊन शेतीमध्ये क्रांती घडवून आणली आहे.
              सर्वसाधारणपणे, पारंपारिक मॅन्युअल फवारणीच्या पद्धती कष्टाच्या, अकार्यक्षम आणि वेळखाऊ असतात. जमिनीवर मोठ्या प्रमाणात यांत्रिक फवारणी पद्धतीमध्ये उच्च ऑपरेशन खर्च, औषधाचा कमी प्रभावी वापर दर आणि शेतात काम करण्यात अडचण येते, ज्यामुळे पीक आणि मातीची भौतिक रचना खराब होते आणि पिकाच्या नंतरच्या वाढीवर परिणाम होतो.     
       एअर अप्लिकेशन ऑपरेशनचा वेग जास्त आहे, खर्च कमी आहे आणि ग्राउंड मशिनरी ऑपरेशनची समस्या सोडवली आहे.
          तरी या तंत्रज्ञानाचा वापर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये करावा असे कृषीपर्यवेक्षक चंद्रशेखर जगताप यांनी सांगितले.
       हे ड्रोन पूर्णपणे स्वयंचलित, रिमोट कंट्रोल आहे. ड्रोन फवारणीने 1 एकरासाठी 10 लिटर पाणी पुरेसे आहे. मॅन्युअल फवारणीसाठी प्रति एकर 150 ते 200 लिटर पाणी वापरले जाते  मॅन्युअल फवारणीसाठी 3 ते 4 तासांच्या तुलनेत ड्रोन फवारणीसाठी 1 एकरसाठी फक्त 8 ते 10 मिनिटे लागतात. मॅन्युअल फवारणीपेक्षा ड्रोन फवारणी अधिक कार्यक्षम आहे. असे आय.पी.एल अॅग्रोटेक चे व्यवस्थापकीय संचालक इंन्द्रजित जगताप यांनी सांगितले.
           यावेळी मंडल कृषिअधिकारी हिंदूराव मोरे , कृषीपर्यवेषक प्रवीण माने कृषीसाह्यक संगीता गावडे, आत्मा साह्यक व्यवस्थापक गणेश जाधव,  महेश भगत, विलास भगत, संजय माळशिकारे, बाबुराव फणसे, प्रमोद घाटे, शहाजी भगत, इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article