-->
पानशेतच्या चिमुरडीच्या बलात्कायाला फाशी; १ वर्षात मिळाला न्याय

पानशेतच्या चिमुरडीच्या बलात्कायाला फाशी; १ वर्षात मिळाला न्याय

दिनांक १५/०२/२०२१ रोजी वेल्हे पोलीस स्टेशन हददीमध्ये एक कातकरी समाजाची लहान मुलगी हरवलीबाबत तक्रार नोंद करण्यात आली होती. 

         सदर बाबत त्या चिमुरडिचे अपहरण झालेबाबत संशय आलेने मा.डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी स्वतः घटनास्थळास भेट दिली व घटनेचे गांभिर्य ओळखून त्यांनी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची विविध आठ पथके तयार करून त्यांना तपासाच्या अनुषंगाने सुचना देवुन स्वतः दिवसभर शोध कार्य दुर्गम भागात चालु ठेवले यावरून वेल्हे पोलीस स्टेशन येथे ०६ / २०२१ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 
         दिनांक १६/०२/२०२१ रोजी सदर पिडीत मुलगी ही मौजे मालखेड, ता. हवेली, जि.पुणे. येथे मालखेड ते थोपटेवाडीकडे जाणारे रोड पुलाचे मोरीचे सिमेंटचे नळी मध्ये ती चिमुरडी मयत स्थितीत मिळुन आली. 
            
      त्यामुळे सदर गुन्हयास भा.द.वी. कलम ३०२, २०१ प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले तसेच या गुन्हयातील चिमुरडीवर बलात्कार होवुन ती मयत झालेबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी अहवाल दिल्याने सदर गुन्हयास भा.द.वी. कलम ३७६, ३७६ ( अ ) , ३७६ आय.जे. व लैंगीक अत्याचार बाल संहिता अधिनियम ४,६,८ तसेच भा.द.वी कलम ए. बी. पाक्सो कायदा कलम ३ प्रमाणे वाढील कलमे लावण्यात आलेली होती. 
        सदर गुन्हयात वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी व त्यांचे स्टाफने अथक परीश्रम करून सी.सी.टी.व्ही फुटेज, एक रिक्षावाला साक्षीदार, दुकानदार व इतर साक्षीदार यांचे कडुन मिळालेल्या माहिती नुसार आरोपी नामे संजय बबन काटकर, वय ३८ वर्षे, रा. कादवे, पानशेत, ता.वेल्हे, जि.पुणे यास तो लपलेल्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसलेल्या अतिशय दुर्गम भागात पोलीस टीमने जावुन ४८ तासाच्या आत जेरबंद केले होते. सदर आरोपी विरूध्द भरपुर पुरावा गोळा करताना परीस्थितीजन्य पुरावा सी.ए. रिपोर्ट, डी.एन.ए. टेस्टींग, मेडीकल ग्राऊंड व इतर पुरावे गोळा करून मा . न्यायालयात त्याच्याविरूध्द दोषारोपपत्र मुदतीत सादर करण्यात आले होते. 

          सदर गुन्हयात मा. पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण यांचे विनंतीनुसार सदरचा खटला मा. जलदगती न्यायालयात सुनावणी करीता पत्रव्यवहार केल्याने सदरचा खटला मा. श्री. संजय ए . देशमुख सो प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीनगर पुणे यांनी जलदगती न्यायालयात खटला सुरू केला a सदर आरोपीस आज दिनांक २८/०२/२०२२ रोजी मा. न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. 
           
सदर गुन्हयाचा तपास मा. डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधिक्षक सो, पुणे ग्रामीण, तात्कालीन अधिकारी मा.श्री विवेक पाटील, अपर पोलीस अधिक्षक व तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, सई भोरे पाटील, श्री पद्माकर घनवट, तत्कालीन पोलीस निरीक्षक स्था. गु.अ. शाखा यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री मनोज पवार, वेल्हे पालीस स्टेशन, यांनी तपास करून त्यांना तपसात वेल्हे पोलीस स्टेशनकडील सहा. फौज. एस. एस. बादंल, सहा. फौज. आर. एस. गायकवाड, पो . हवा. / १ ९ ४७ ए.एन. आडवाल , पोना. / ९०३ ए.पी. शिंदे , पोकॉ / ८५४ ए.आर. साळुंखे, पोकॉ / १८४ एस.आर. ओमासे, पोकॉ / २७२२ व्हि. एस. मोरे, पोकों / २८४३ डी.ए. जाधव यांनी मदत केली. सदर खटल्यात श्री विलास पठारे यांनी सरकारी अभियोक शिवाजीनगर पुणे म्हणुन सरकारतर्फे कामकाज पाहीले तर कोर्ट कारकुन म्हणुन पोना/२४४५ प्रसाद मांडके, व स. पो. फौज विद्याधर निचित, ट्रायल मॉनिटर सेल तर केस अधिकारी म्हणुन सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी कामकाज पाहीले सदर कामगिरीबद्दल मा.पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रमीण यांचेकडुन सहा पोलीस निरीक्षक मनोज पवार व त्यांच्या पथकास ३५,००० / - रूपये रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article