-->
तरडोली ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंचांच्या पतीचा हस्तक्षेप; सरपंचांवर कारवाई करण्याची मागणी

तरडोली ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंचांच्या पतीचा हस्तक्षेप; सरपंचांवर कारवाई करण्याची मागणी

बारामती तालुक्यातील तरडोली येथील ग्रामपंचायतीच्या कारभारात विद्यमान महिला सरपंचांचे पती वारंवार हस्तक्षेप करून मनमानी कारभार करत आहेत. त्यांची मनमानी थांबण्यासाठी एका निवेदनाद्वारे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पंचायत समिती यांच्याकडे केली आहे.

          याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 
तरडोली येथील सरपंच सौ. विद्या हनुमंत भापकर यानी सरपंच पदाचा पदभार स्विकारल्यापासून त्यांचे पती हनुमंत हंबीरराव भापकर हे ग्रामपंचायत दैनंदिन कामकाजामध्ये हस्तक्षेप करत आहेत. सदस्यांना अरेरावीची भाषा करणे ग्रामपंचायत गोपनीय माहितीचा सोशल मिडीया माध्यमातुन प्रसारण करणे, गोपनीय माहिती पाहणे. ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याबरोबर उर्मट भाषेत बोलणे त्यांना कामे सांगणे तसेच सरपंचाची सही नागरीकांना पाहिजे असल्यास अडवणुक करणे प्रत्येक ग्रामपंचायत विकास कामामध्ये हस्तक्षेप करणे, मासिक मिटींग झालेल्या ठरावावर सौ. भापकर या आपल्या पतीला विचारल्याशिवाय मान्यता देत नाहीत असा प्रकार घडत आहे. 
      वरील प्रकाराबद्दल ग्रामपंचायत सदस्यांनी वारवार सांगुन सुध्दा ते बहुमताचा अनादर करून कामकाजात सहभाग घेतात व महिला सरपंच असताना पतीने सहभाग घेणे हे संदर्भीय शासन निर्णयाच्या विरोधात असुन ते हस्तक्षेप करत असल्याने सौ.विद्या भापकर त्यांचे पती श्री हनुमंत भापकर हे संगनमताने ग्रामपंचायत चालवत आहेत हा एकप्रकारे लोकशाही हत्या चालवली असल्याने सौ. भापकर सरपंच याच्यावरती कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे.
       निवेदनावर उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह्या आहेत.
सदर निवेदनाबाबत सरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article