
सोमेश्वरला महाशिवरात्री निमित्त ५० हजारावर भावीकांची गर्दी
सोमेश्वरनगर (प्रतिनिधी )
बारामती तालुक्यातील प्रती सोरटी सोमनाथ म्हणुन ओळखले जाणारे ऐतिहासिक श्री क्षेत्र सोमेश्वर(सोमयाचे करंजे ) येथे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी हजारो भावीकानी रांगा लावुन दर्शनाचा लाभ घेतला .
मध्यरात्री १२ वाजता बारामती चे उपविभागीय अधिकारी (मे प्रांत )दादासाहेब कांबळे व सीमा कांबळे या दांपत्त्याच्या हस्ते महापुजा करणेत आली. पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर यांचेही हस्ते अभिषेक करण्यात आला यावेळी विश्वस्त समिती अध्यक्ष प्रताप भांडवलकर, सचीव राहुल भांडवलकर, ॲड गणेश आळंदीकर, मोहन भांडवलकर यांचेसह विश्वस्त समिती सदस्य हजर होते.
गेले आठ दिवस चालु असलेल्या महारुद्राची सांगता सकाळी सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व सहकारी संचालक वर्गाच्या हस्ते करणेत आली .बारामतीचे गटविकास अधिकारी अनिल बागल ,पंचायत समिती मा. सभापती नीता बारवकर आदी मान्यवरानी येथे भेटी दिल्या. येथे येणाऱ्या भावीकांना केडगाव चे धीरज गायकवाड, भावीक विजय पवार, डॉ.गणेश जगताप व महेश मल्हारी जगताप यांचेवतीने अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र होळ चे डॉ. ज्ञानदीप राजगे, डॉ प्रज्ञा खोमणे नाझीरकर,डॉ कर्णवर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी परवेझ मुलाणी व सहकारी वर्गाने भावीकाना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीरे बंद असल्याने यात्रा होत नव्हत्या मात्र यंदा काही प्रमाणात कोरोना कमी झाल्याने भावीकानी रांगा लावुन दर्शनाचा लाभ घेतला.भावीक नसल्याने मंदीराच्याव्यवस्थापनाचा दैनंदिन खर्च भागवणे देखील अवघड झाले होते मात्र महाशिवरात्री च्या यात्रेने पुजारी वर्ग, प्रसादविक्रेते याना मोठा दिलासा मिळाला. कोकणातुन येणारा भावीक येथे जास्त असतो. अनेक वर्षापासुन मंदीर परिसरातील दुकाने नजीक बांधलेल्या गाळ्यात गेल्याने गर्दी झाली तरी गोंधळ उडाला नाही.
वडगाव निंबाळकर चे स पो नि. सोमनाथ लांडे यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त येथे ठेवण्यात आला होता.