
जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ
Saturday, March 12, 2022
Edit
बारामती: 12 मार्च रोजी सकाळी आठ साडे आठ वाजता जळोची स्मशान भूमी च्या पाठीमागे एक जळालेल्या अवस्थेत मध्ये पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह मिळालेला आहे
सदर इसमाची ओळख पटलेली असून त्याचे नाव अभिजीत विजय खरात वय 35 वर्ष राहणार अंथूर्णे तालुका इंदापूर व सध्या राहणे श्रीराम नगर बारामती
सदरचा इसम हा औषधाच्या दुकानात कामाला होता केलेल्या चौकशी वरून व घटनास्थळावरील परिस्थितीवरून सदर इसमाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेऊन रात्री उशिरा स्मशान भूमी च्या पाठीमागे आत्महत्या केलेली प्रथमदर्शनी दिसून येत आहे
प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे करत आहेत. घटनास्थळावर विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट दिलेली आहे