
वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांचा पुणे जिल्हा परिषदेकडून कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान
Sunday, March 20, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांना जिल्हा परिषद पुणे यांच्यातर्फे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणेश कला क्रीडा संकुल पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.