-->
बारामती शहरात अचानक राबवलेल्या कोम्बिंग मोहिमेमध्ये मटका जुगार घेणाऱ्या ५ लोकांना अटक

बारामती शहरात अचानक राबवलेल्या कोम्बिंग मोहिमेमध्ये मटका जुगार घेणाऱ्या ५ लोकांना अटक

काल सायंकाळी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या सूचनेप्रमाणे बारामती शहरांमध्ये अचानक पणे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आली यामध्ये दोन अधिकारी पंधरा पोलिस कर्मचारी व दहा होमगार्ड यांनी संभाव्य ठिकाणी मटका दारू तसेच गांजा विक्रीचे ठिकाणी अचानकपणे वेगवेगळ्या ठिकाणावरून साध्या व गणवेश धारी पोलिसांची पथके तयार करून प्रवेश करून पायी गस्त करून अचानक पणे संभाव्य ठिकाणी चेक केले असता.
1 वडके नगर अमराई याठिकाणी सचिन हिरालाल साळुंखे वय 32 वर्ष राहणार पान गल्ली व राम बाळासाहेब काळे वय सत्तावीस वर्ष राहणार वाडेकर नगर
मूळ मालक अर्जुन राजू पाथरकर वय 23 वर्ष
2. पान गल्ली याठिकाणी पत्र्याच्या खोलीमध्ये
विठ्ठल शामराव गायकवाड वय 55 वर्ष राहणार गुणवडी राजेंद्र बाळासाहेब कोरडे वय 54 वर्ष राहणार पिंपळी
मूळ मालक शेखर सोनवणे
3 एसटी स्टँड समोर अमराई अशोक सोनबा साठे वय 66 वर्षे राहणार मालेगाव खुर्द
मूळ मालक मयूर कांबळे
वरील सर्वांकडून एकूण साडेपाच हजार रुपये रोख व मटका चिठ्ठी पेन व इतर जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. या ठिकाणी मटक्याचे मूळ मालक वरील तिघे यांना सुद्धा अटक करून त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे जर कुणी मटका जुगार चालवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन मूळ मालकाला अटक करण्यात येणार आहे.
तसेच शहरातील अवैध दारु विक्री करणारे एकूण दहा लोकांना व गांजा विकणारे चार लोकांना चेक करण्यात आले परंतु त्याठिकाणी पोलिस छाप्याच्या वेळी काहीही मिळून आले नाही. तसेच पान गल्ली अमराई देसाई इस्टेट अशोक नगर या भागात विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर फिरणाऱ्या मोटर सायकल धारांना चेक करण्यात यातील काही लोकांकडे  विचारपूस केली त्यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले परंतु गुन्हेगार अशाच प्रकारे विना नंबर प्लेट गाड्या वापरून गुन्हे करत असतात त्यामुळे या प्रकारे चेकिंग घ्यावी लागेल तरी सर्व नागरिकांना विनंती आहे आपली परिसर भयमुक्त ठेवायचा असेल तर आपण स्वतः सुरुवातीला पोलिसांना सहकार्य करा आपल्या सर्व गाड्यांना अटी व मान्यताप्राप्त नंबर प्लेट लावून घ्या यापुढे या कारवाया सतत करण्यात येतील सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर सागर ढाकणे संजय जगदाळे कल्याण खांडेकर तुषार चव्हाण दशरथ कोळेकर भोसले महेश कोठे दशरथ राऊत दशरथ इंगवले. बीट मार्शल काळे मोरे यांनी केलेली आहे. अवैध धंद्या बाबत माहिती मिळाल्यास आमच्या मोबाईलचा व्हाट्सअप नंबर 9823562255 वर लोकेशन कळवावे ही विनंती. व्हेरिफाय करून वस्तुनिष्ठ माहिती मिळाल्यास कारवाई करण्यात येईल. माहिती देणारा चा नंबर कुठेही शेअर केला जाणार नाही याची खात्री ठेवावी.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article