-->
अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईकरिता १२५ कोटी रूपयांचा निधी वितरित – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

अतिवृष्टीमुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईकरिता १२५ कोटी रूपयांचा निधी वितरित – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती


मुंबई,दि. 9 :-       जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत 3 ऑगस्ट 2021 रोजी घेतलेल्या  मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार 125 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती, मदत व  पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

जुलै ते ऑक्टोबर, 2021 या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांकरीता वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्य निधीमधून जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. जुलै,2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्‌भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीकरिता बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्याकरिता वाढीव दराने राज्य निधीमधून एकूण रु. 12507.01 लाख (अक्षरी रुपये एकशे पंचवीस कोटी सात लाख एक हजार फक्त) निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय 07 मार्च 2022 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी पद्म पुरस्काराकरिता शिफारसयोग्य प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article