
पत्रकार भरत निगडे यांना छत्रपती संभाजी महाराज आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान
Friday, March 18, 2022
Edit
नीरा : सासवड (ता.पुरंदर) येथे झालेल्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात तालुक्यातील नीरा येथील दैनिक लोकमतचे पत्रकार भरत अर्जुन निगडे यांना 'छत्रपती संभाजी महाराज आदर्श पत्रकार' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शनिवार दि.१२ रोजी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परषद आयोजित राज्यस्तरीय १३ वे छत्रपती साहित्य संम्मेलन सासवड येथील जयदीप मंगल कर्यालयात पारपडले. यामध्ये मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व दै.लोकमतचे निर्भीड पत्रकार भरत निगडे यांना 'छत्रपती संभाजी महाराज आदर्श पत्रकार' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.गुलाब वाघमोडे व विजय कोलते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भा.ल.ठाणगे, पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते, सोनाली यादव पुणे जिल्हा मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वाडेकर, पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे उत्तम कामठे, गौरव कोलते, पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष श्रीकांत ताम्हणे, सासवडचे माजी उपनगराध्यक्ष संजयआण्णा जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, पुरंदर तालुका सेवादल अध्यक्ष रामभाऊ काळे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, पुणे जिल्हा
पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, पुणे जिल्हा सोशल मिडिया परिषदेचे उपाध्यक्ष राहुल शिंदे यांचे सह अनेक साहितीक, लेखक, कवी व साहित्य प्रेमी उपस्थित होते.