
गंभीर गुन्ह्यातील १ वर्षापासून फरार असलेला आरोपी बारामती तालुका पोलिसांनी केला जेरबंद
Wednesday, March 2, 2022
Edit
सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अमित अविनाश कांबळे (राहणार खांडज तालुका बारामती जिल्हा पुणे )हा शिरवली येथे येणार आहे. अशी माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी माळेगाव पोलीस चौकीचे अमलदार पोलीस हवालदार शशिकांत वाघ, राम कानगुडे, पोलीस नाईक राजेंद्र काळे, पोलीस शिपाई प्रशांत राऊत, दीपक दराडे यांना त्यास जेरबंद करणे कामी रवाना केले.
सदर पथक आरोपीचे वाट बघत शिरवली येथे थांबले असताना, आरोपीस पोलिसांची चाहूल लागल्याने तो पळून जात असताना पथकाने त्यास शिताफीने अटक केली आहे.
आरोपीस पुढील तपास कामी सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांचे ताब्यात दिले आहे.