
लोणी भापकर व सुपे परिसरात रानगव्यांचा वावर; शेतकऱ्यांनी त्यांच्या मार्गक्रमणात अडथळा न आणण्याचे वनपरीक्षेत्र अधीकाऱ्यांचे आवाहन
Monday, March 21, 2022
Edit
मोरगाव : सह्याद्री पर्वतरांगेतील गवा सुपा परगण्यातील पाहुणचार घेत आहे. काल दि. २१ रोजी लोणी भापकर परीसरात चार गवे आढळुन आले असुन आज सुपा येथे आढळून आले. अन्न पाणी व निवाऱ्याच्या शोधार्थ हे गवे आले असून शेतकऱ्यांनी त्यांच्या मार्गक्रमणात अडथळा न आणण्याचे आवाहन तालुका वनपरीक्षेत्र अधीकारी शुभांगी लोणकर यांनी केले आहे.
सह्याद्री पर्वतरांग व भोर तालुक्यातील चार गवे बारामती तालुक्यातील लोणी भापकर, बाबुर्डी नंतर आज सुपा परगण्यात आले आहेत. याबाबतची माहीती समजताच तालुका वनपरीक्षेत्र अधीकारी शुभांगी लोणकर, वनपाल अमोल पाचपुते, वनरक्षक गोरे मॅडम, गणपत भोंडवे, शिवाजी दिवटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गव्यांना कोणी त्रास देऊ नये म्हणून देखरेखीसाठी चोवीस तास सतर्क तालुका वनपरीक्षेत्र अधीकारी लोणकर यांनी कर्मचारी ठेवले आहेत.
वनखात्याने केलेल्या पाहणीनुसार गेल्या दोन दिवसात सदर प्राण्यांनी शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान केले नाही. मात्र कोणाचे नुकसान झाल्यास वनखात्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वनपाल अमोल पाचपुते यांनी केले आहे.
नवीन अधीवास व चाऱ्याच्या शोधार्थ गवे बारामती तालुक्यात आले आहे. मात्र या भागात दाट जंगल, पुरेसे गवत नसल्याने या गव्यांचा अधीक काळ अधीवास राहणार नाही. यांच्या मार्गक्रमणात अडथळा आणु नये.
वनपाल : अमोल पाचपुते