-->
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात बदनामीकारक लिखाण केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात बदनामीकारक लिखाण केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात फेसबुकवर बदनामीकारक लिखाण केल्याबद्दल वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           याबाबत  नितीन संजय यादव रा. करंजेपुल  ता  बारामती जि.पुणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी  Satish Vartak 2)Vishvjit Indradev Potphade  3) Vipul Bhongale 4) Vinod Pawar 5) Veejay Bhoge 6)Rajnikant Rathod 7) Sachin Bhaiyya Tippate Patil 8)Shantanu Ghaiwat 9) Prasanna Nijampurkar 10) Omkar Devargaonkar 11) Ashutosh Bhitade 12) Harish Shete 13) Kunal Mhadik 14) गणेश चोरमारे  15) Abhijit Deshmukh  या नावाचे फेसबुक अकाउंट धारकांवर गुन्हा दाखल केला आहे.  
 
           सविस्तर हकीकत अशी की, दि १६ व १७ मार्च रोजी फेसबुकवर केंद्र सरकारने द कश्मीर फाईल्स करमुक्त करावा: अजित पवार, अशा फेसबुकवरील बातमीच्या पोस्टवर यातील आरोपीत यांनी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार  अजित पवार यांना अब्रुनुकसान कारक आहेत हे माहीत असताना वर नमुद सर्व फेसबुक अकाउंट धारक व्यक्तींनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बाबत अश्लिल आक्षेपार्ह बदनामीकारक शिवीगाळ करणा-या कमेंट फेसबुक या सार्वजनिक समाज माध्यमावर पोस्ट केल्या आहेत म्हणुन वरील सर्व फेसबुक अकाउंट धारक इसमांविरूध्द माझी तक्रार आहे वगैरे मजकुराची फिर्याद करंजेपुल दुरक्षेत्र  वरुन आलेने गुन्हा रजि दाखल करुन दाखल केला आहे.  गुन्ह्याचा पुढील तपास पोसई योगेश शेलार हे करीत आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article