
आजपासून प्रायोगिक तत्त्वावर हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा सुरु
Wednesday, March 30, 2022
Edit
मोरगाव : हॅलीकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन सेवा आजपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरु झाली. पाच गणेश भक्तांना घेऊन ही सेवा ओझरपासून सुरु झाली. अष्टविनायक क्षेत्री देवस्थानचे विश्वस्त मंडळ व सरपंच, पुजारी यांनी मान्यवरांचा सन्मान केला. तर ही सेवा लवकरच कायमस्वरूपी केली जाणार असल्याची माहीती ओझरचे माजी मुख्य विश्वस्त बबन मांडे यांनी दिली.
आज दि ३० रोजी प्रायोगिक तत्त्वावर हॅलीकॅप्टरद्वारे अष्टविनायक सेवे सुरु झाली आहे. ओझर येथे आरती करुन या सेवेस शुभारंभ झाला. आज पहील्या दिवशी माजी अध्यक्ष बबन मांडे व इतर चार गणेश भक्त अष्टविनायक यात्रेला आले होते. ओझर नंतर रांजणगाव, सिध्दटेक, मोरगाव, थेऊर ,पाली, महड, लेण्याद्री असे मार्गक्रमण होणार आहे. ओझर येथील विघ्नहर देवस्थानचा हा उपक्रम आहे . यासाठी गणेश भक्त शेतकऱ्यांनी हॅलीपॅडसाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली आहे. ओझर देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष गणेश कवडे यांनी याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले.
आज अष्टविनायक वारी करत असताना मोरगाव येथे वरील सर्व भक्त आले असता चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार व मोरगावचे विद्यमान सरपंच निलेश केदारी यांनी मान्यवरांचा शाल फोटो देऊन यथोचित सन्मान केला.