-->
कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दिव्याभारती रोहिदास खोमणे

कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दिव्याभारती रोहिदास खोमणे

कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक ( ता. बारामती ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दिव्या भारती रोहिदास खोमणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
    लता नलवडे यांच्या उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नवीन उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रवींद्र खोमणे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या सूचनेनुसार उपसरपंच पदासाठी दिव्याभारती रोहिदास खोमणे यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी खोमणे यांची बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य हनुमंतराव जगदाळे, आबा पडळकर, आशाबी सय्यद, राजेंद्र पवार, सुनीता खोमणे, माजी सरपंच दिलीप खोमणे, माजी उपसरपंच अंकुश चव्हाण, उमाजी खोमणे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डी के खोमणे, राहुल भगत, हेमंत गडकरी, रोहिदास खोमणे उपस्थित होते. खोमणे यांच्या निवडीनंतर सतीश खोमणे समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष व्यक्त केला. निवडीनंतर बोलताना खोमणे म्हणाल्या की, सतीश खोमणे यांच्या नेतृत्वाखाली गावातील लोकांच्या विकासासाठी काम करणार असून महिलांसाठी विशेष उपक्रम राबवणार आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article