
मोरगांवचे सरपंच निलेश केदारी आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
Sunday, March 20, 2022
Edit
मोरगाव : बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र ग्रामपंचायत मोरगांव येथील सरपंच निलेश हरीभाऊ केदारी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केले आहे. सदर पुरस्कार जिल्हा परीषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
जिल्ह्यातील आदर्श जिल्हा परीषद सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभीयंता, गुणवंत शिक्षक, विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आज दि. २० रोजी संपन्न झाला. गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परीषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हा परीषद सदस्य भरत खैरे, मोरगांवचे माजी सरपंच पोपट तावरे, उपसरपंच संतोष नेवसे, ग्रामसेवक मोरेश्वर गाडे आदी उपस्थित होते.
मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी ग्रामपंचायत मोरगावच्या माध्यमातून रस्ते, लाईट, पाणी, स्वच्छता आदी सोई सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. गावातील नागरीकांना मूलभूत सुविधांबरोबर कोरोना काळात विविध उपाय योजना राबबुन कोरोना वेशीवरच अडवून ठेवला होता. केदारी यांनी राबविलेल्या योजना व त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पुणे जिल्हा परीषदाचा आदर्श सरपंच पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. या पुरस्कारानंतर बोलताना केदारी यांनी सांगितले की, हा पुरस्कार समस्त मोरगावकर ग्रामस्थांचा असून आगामी काळात मोरगांवकरांना अधीकाधीक सुवीधा पुरविण्याचा मानस असेल.