
श्री मोरया सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन तावरे तर व्हा. चेअरमनपदी शिवदास गायकवाड
Wednesday, March 9, 2022
Edit
मोरगाव : श्री मोरया विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्यानंतर आज चेअरमन व व्हाईस चेअरमची निवड संपन्न झाली. यामध्ये चेअरमनपदी नितीन पोपट तावरे तर व्हाइस चेअरमनपदी शिवदास दिगंबर गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.
आज चेअरमन पदाच्या निवड प्रसंगी सुनील दत्तात्रय तावरे, संजय प्रभाकर तावरे, गोरख दिनकर सणस, चंद्रकात हरीदास नेवसे, सुशील सिद्राम तावरे, नितीन पोपट तावरे, नवनाथ रामचंद्र नेवसे, शिवदास दिगंबर गायकवाड, मनिषा बाबा पालवे, एकनाथ विठोबा थोरात, पोपट काशीनाथ तावरे, पोपट श्रीमंत ढोले, मंदाकीनी मारुती तावरे हे सदस्य उपस्थित होते . माजी सरपंच पोपट सर्जेराव तावरे यांच्या श्री गणेश मयुरेश्वर सर्वधर्म विकास पॅनलच्या सदस्यांपैकी नितीन पोपट तावरे व शिवदास दिगंबर गायकवाड यांनी अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केले.
निवडणूक निर्णय अधीकारी म्हणून पाटणे यांनी कामकाज पाहीले. नवनिर्वाचीत पदाधीकाऱ्यांचा सत्कार माजी सरपंच पोपट तावरे व साहाय्यक निबंधक मिलींद टांगसाळे यांनी केला. या निवडीनंतर बोलताना चेअरमन नितीन तावरे यांनी सांगितले की सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन शेतकरी हिताचे निर्णय व पात्र लाभधारक शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे अधीकाधीक मार्गींलावणार असल्याचे सांगितले.