-->
पनवेल अधिवेशनासाठी पुण्यातून १० हजार शिक्षकांची नोंदणी - बाळासाहेब मारणे

पनवेल अधिवेशनासाठी पुण्यातून १० हजार शिक्षकांची नोंदणी - बाळासाहेब मारणे


महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पनवेल अधिवेशनासाठी पुणे जिल्ह्यातून 10 हजार शिक्षकांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली
 शिक्षक संघाचे पनवेल येथे १८ मार्च रोजी राज्यव्यापी अधिवेशन होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,ग्रामविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सुनील तटकरे,सुप्रिया सुळे, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत

घोषणांसाठी मंत्रालयात हालचाली
पनवेल अधिवेशनात शरद पवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास, ग्रामविकास, शालेय शिक्षण विभागाचे मंत्री उपस्थित राहणार असल्याने मागण्यांबाबत घोषणा करण्यासाठी मंत्रालयात सचिवपातळीवर बैठका सुरू आहेत, शिक्षकांचे जुनी पेन्शन, वेतन त्रुटी, एकल पतिपत्नी व विस्थापित शिक्षकांसाठी बदली धोरणात दुरुस्ती, रखडलेली पदोन्नती,१०-२०-३० आश्वासित योजना, संगणक परीक्षा वसुली, कॅशलेस विमा, वस्तीशाळा व अप्रशिक्षित शिक्षक सेवाजेष्ठता यांसह अन्य रखडलेल्या प्रश्नांवर या अधिवेशनात उपाययोजना होण्याची शिक्षक संघाची मागणी असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली

संघ शक्तीचा प्रत्यय
राज्य शासनाने पनवेल येथील शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी १५,१६ व १७ मार्च रोजी तीन दिवसांची विशेष रजा मंजूर केली असून पुणे जिल्ह्यातून १० हजार शिक्षकांनी अधिकृतपणे पावती घेऊन नोंदणी केली आहे, तालुका संघ, महापालिका व नगरपरिषद शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिवेशन प्रचार व नोंदणीसाठी जोरदार मोहीम राबविल्याने अवघ्या ३ दिवसांत १० हजार नोंदणीचा टप्पा पूर्ण करून संघ शक्तीचा प्रत्यय दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article