-->
तुषार भाऊ शिंदे युवा मंच तर्फ़े महिला दिन साजरा परिसरातील सर्व आशा वर्कर कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

तुषार भाऊ शिंदे युवा मंच तर्फ़े महिला दिन साजरा परिसरातील सर्व आशा वर्कर कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी - आज दिनांक 19 मार्च 2022 रोजी तुषार भाऊ शिंदे युवामंच तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त बारामती तालुक्यातील शिर्सुफळ शासकीय रुग्णालय मध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर महिला यांना कोरोना  योद्धा पुरस्कार तुषार भाऊ शिंदे युवामंच तर्फे देण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विश्वासराव नाना पाटील देवकाते हे उपस्थित होते. तसेच शिर्सुफळचे सरपंच आप्पासाहेब आटोळे, तुषार भाऊ शिंदे (उद्योजक, सामाजिक कार्येकर्ते ) तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, एडवोकेट राजकिरण शिंदे, उमेश जगताप, दत्तात्रय ठोंबरे, विश्वास आटोळे, डॉक्टर चौधरी, डॉक्टर शिंगारे, नामदेव झगडे, गणपत आटोळे, प्रमोद बोराटे, संतोष घोडे, रणजित जगताप, कचर शिंदे व उपस्थित सर्व महिला, आशा वर्कर आणि सर्व हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होते. तुषार भाऊ शिंदे यांच्याकडून कुठले ना कुठले चांगले काम वारंवार गावात  व गावातील परिसरात घडत असते, त्यात आजचे कार्य खूप चांगले आणि उत्तम आहे, असे मत विश्वासराव नाना पाटील देवकाते यांनी व्यक्त केले. भविष्यात या कामाची पावती त्यांना नक्कीच मिळेल असा विश्वास नाना पाटलांनी दिला, तसेच महिला वर्गाने देखील तुषार शिंदे यांचे आभार मानले आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article