
महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांकडून पेटवून घेण्याचा प्रयत्न; शाखा अभियंत्याने समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला
Wednesday, March 2, 2022
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथील २/३ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वीज वितरण कंपनीच्या शाखा कार्यालयाच्या निषेधार्थ डिझेलचे कॅन आणून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु शाखा अभियंता यांनी समजूत घातल्याने पुढील अनर्थ टळला. या शेतकऱ्यांकडे वीज वितरण कंपनीची शेतीपंपांची मोठी थकबाकी होती. कंपनीने बिल भरण्यासाठी तागादा लावल्याने एक ५ हजार रुपयांचा हप्ता भरला, उर्वरित बाकी न भरल्याने वीज वितरण कंपनीने सदर खातेदारांची लाईन बंद केल्याने त्याचा राग आल्याने संतप्त २/३ शेतकरी महाशिवरात्री दिनी एकत्र येत डिझेलचे कॅन घेऊन कार्यालयात आले.
लाईन जोडा अन्यथा जमीनच तुमच्या नावावर करून घ्या अन्यथा आम्ही पेटवून घेऊ असा इशारा दिल्याने शाखा अभियंता श्री. जाधव यांनी सदर खातेदारांची योग्य ती समजूत काढून बीले भरण्याचे आवाहन केल्याने सदर संतप्त शेतकरी शांत घरी गेले.