-->
बालपणीची आठवण; जुन्या आठवणीतील सोमेश्वर मंदिर

बालपणीची आठवण; जुन्या आठवणीतील सोमेश्वर मंदिर

या जुन्या आठवणीतील सोमेश्वर मंदिर..मग बालपणीची महाशिवरात्री.आईसोबत खेळणी आणि खाऊसाठी हट्ट केलेली जिज्ञासामय गर्दीतून मारलेला फेरफटका..गजबजलेली पायी चालत, बैलगाडी, नुकताच आलेला टॅक्टर यातून यातून आलेली स्त्रीपुरूष,मुलं,वयवृद्ध यांच्या आनंदमय भक्तीरसाची गर्दी..खेळणी आणि खाऊ या ऐकमेव लालसेपोटी आलेलो आम्ही बालसंवगडी.आईचा प्रेमळ नकाराचा फटकारा.पण पुन्हा रडवेला स्वरातील मागणी पण कांहीची पुर्तता तर कांहीची अपुर्तता..जिज्ञेसेने,बालमनाने यात्रेचा घेतलेला आईसोबतचा आनंद कांहीं औरच..यात्रेत भेटलेले नजिकची पैपाहुणे,आईच्या मैत्रिणी..त्यांच्या प्रेमळ गप्पा.आणि सर्वकाही झाल्यावर गुळुंचे गांवी परत पायी बालसोबती,गावातील माणसे यांचे बरोबर जाण्याचे वेध..गुरवकीतून रुपाडीच्या डोंगरातून पाऊलवाट दगडं,कुसळं यातून दमलेलं,थकलेलं पाय कस तरी ओढत दिवस मावळायच्या आत घरी पोहचण्याची लगबग.घरी पोचल्यावर जेवणं आणि झोपणं हे कळायचही नाही.. सकाळी उठल्यावर कपाळाला लावलेला चित्रमय पिवळा गंध.पुसुच नये असे वाटे.फुगे केव्हाच फुटून गेलेले मात्र खेळणी जशीच्या तशी.होता होता सकाळचे दहा वाजत.खेळणी तशीच पोरकी सोडून दप्तर पाठीशी टाकून शाळेकडे नाईलाजाने पावलं पडत.शाळा भरे.सर्वकाही शाळेतील कामकाज संपे घंटा होई त्यावेळी गुरुजींनी निबंध सांगितलेला असे.. महाशिवरात्री..एक यात्रा.मग आठवणींना उजाळा देत सांयकाळी दौतीत टाक बुडवून बालमनाला भावलेला निबंध लिहिला जाई..ढणढणत्या चुलीपुढं भाकरीचा खरपूस वास घेत आईला वाचून दाखविला जाई.त्यावेळी तव्यावरील टरारुन फुगलेली भाकरी आणि आईचा आनंदाने खुललेला चेहरा सारखाच दिसे..पण आज ते काहीच नाही..पण खरेच ते रम्य बालपण आणि ती प्रेमळपणात अनुभवलेली महाशिवरात्री.खरे पुन्हा तशी अनुभवता येईल का ?..                           श्री.एस.एस.गायकवाड सर, करंजेपूल.                 मो.नं.७७६८०९८२९६

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article