
थोपटेवाडी येथील धिरज दळवी यांच्या मुलाच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शाळेतील मुलांना केले शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप
Wednesday, March 23, 2022
Edit
कोऱ्हाळे बु: बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावातील धीरज बाळासो दळवी यांनी आपला लहान मुलगा देवांश याच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त थोपटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना पेन्सिल, वह्या, खोडरबर व खाऊचे वाटप केले.
कार्यक्रमास धीरज दळवी, सदस्य पृथ्वीराज नलवडे, लखन कडाळे, गणेश शेडगे, प्रमोद थोपटे, संदीप नलवडे, भाऊसो थोपटे व ग्रामस्थ उपस्थित होते.