-->
सर्व शेतकरी बांधवांसाठी के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. कंपनीतर्फे जाहीर निवेदन

सर्व शेतकरी बांधवांसाठी के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. कंपनीतर्फे जाहीर निवेदन

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया तसेच स्थानिक वृत्तपत्रामध्ये श्री. रखमजी भगवान मदन या शेतकऱ्याने के. बी. बायो ऑरगॅनिक्स कंपनीचे ‘डाऊनी रेझ’ हे बुरशीनाशक वापरल्यामुळे वांगी पिकाचे नुकसान झाले अशी बातमी फिरत आहे किंबहुना ती जाणीवपूर्वकरित्या फिरवली जात आहे. 
     इथे आम्ही आमच्या कंपनीतर्फे सांगू इच्छितो की, आमची कंपनी गेल्या 5 वर्षांपासून वनस्पतीजन्य कीटकनाशकांवर 90 संशोधकांच्या साथीने संशोधन करीत आहे आणि गेल्या 3 वर्षांपासून आमची कीटकनाशके लाखो शेतकरी वापरत आहेत. आज आम्ही इथे सांगू इच्छितो की, आमची सर्व उत्पादने 'इकोसर्ट सर्टीफाईड' असून सर्व उत्पादने 'पेटंट संरक्षित' आहेत. त्याचप्रमाणे ही उत्पादने ऑरगॅनिक असल्याने याचा कोणताच गंभीर परिणाम दिसून येत नाही. वनस्पतीजन्य उत्पादने असल्याने वनस्पतींचाच अंश आपण वनस्पतींवर वापरत असल्याने पिकाला याची इजा तर होत नाहीच याउलट पिकांवर सकारात्मक परिणाम दिसून येतो, जो शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. कंपनीचे औषधाच्या संशोधनापासून विक्रीपर्यंत सर्व बाबींवर अगदी काटेकोरपणे लक्ष असते आणि असे करणाऱ्या मोजक्या कंपन्यांपैकी आमची कंपनी आहे याचा आम्हाला अभिमान आहे, हे देखील आम्ही इथे नमूद करू इच्छितो. 
       
      आम्ही संशोधित केलेली उत्पादने आमची स्वतःची प्रयोगशाळा, चाचणी क्षेत्र आणि विविध प्रकारच्या वातावरण आणि पिकांमध्ये पडताळून पाहतो आणि अपेक्षित परिणाम मिळाल्यानंतरच आम्ही ती उत्पादने बाजारामध्ये आणतो. आमच्या उत्पादनाचा वापर करून शेतकरी निर्यातक्षम उत्पादन मिळवतात कारण त्यामधे कोणत्याही रसायनांचा अंश आढळून येत नाही, याचाच अर्थ आमच्या उत्पादनांमध्ये कोणतेही हानिकारक घटक नाहीत, ज्याचा गंभीर परिणाम मानवी किंवा वनस्पती जीवनावर होईल. कृषीमाल निर्यात करीत असताना सर्वात मोठा अडथळा असतो तो रसायन शेषांशाचा म्हणजेच रेसिड्यूचा मात्र पीक अगदी शेवटच्या म्हणजेच काढणीच्या अवस्थेत असताना देखील निर्यातदार शेतकरी या औषधांचा वापर करतात आणि सहज आणि यशस्वीपणे कृषीमालाची निर्यात करतात. के. बी. एक्सपोर्टच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये देखील आम्ही आमचीच म्हणजे के. बी. बायो ऑरगॅनिक्सचीच उत्पादने वापरून प्रत्येक दिवशी 10 टन आणि त्याहून अधिक कृषीमाल युरोप मार्केटला निर्यात करतो जी बाजारपेठ निर्यातीसाठी सर्वात अवघड समजली जाते. याच बळावर आज कंपनी ही सर्व उत्पादने परदेशात देखील निर्यात करते. 

      आजपर्यंत विविध रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी आमची विविध उत्पादने शेतकऱ्यांनी वापरली आहेत आणि त्यांना त्याचे अप्रतिम परिणाम मिळाले आहेत, ज्याचा परिणाम म्हणून आज कंपनीची उत्पादने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून वापरली जात आहेत. आज पिकांवरील कोणताही रोग अथवा कीड नियंत्रणासाठी शेतकरी अगदी प्राधान्याने के. बी. बायो ऑरगॅनिक्सची औषधे अगदी विश्वासाने घेऊन जातात आणि पिकांवर विश्वासाने वापरतात ज्याचे त्यांना अतिशय उत्तम परिणाम दिसून येतात जी आमच्यासाठी अतिशय सकारात्मक बाब आहे. 
       वरील सर्व बाबींचा विचार करता आणि आमच्या हजारो शेतकऱ्यांच्या उत्पादन वापराच्या अनुभवानुसार सदरची बातमी ही संबंधित शेतकऱ्याने कंपनीची निष्कारण बदनामी करण्याच्या हेतूने दिली असल्याची आम्हाला दाट शक्यता वाटते. त्याचप्रमाणे संबंधित शेतकरी श्री. रखमाजी भगवान मदन यांनी आकसापोटी आणि वैयक्तिक फायद्यासाठी स्थानिक मीडियाला हाताशी धरून कंपनीची बदनामी सुरू केली आहे, या सर्व प्रकारामुळे आमची दर्जेदार उत्पादनांच्या प्रतिष्ठेला व बाजारातील आमच्या कंपनीच्या नावाला धक्का पोहोचत आहे, जी बाब अतिशय गंभीर आहे. या सर्व गोष्टींवर आम्ही लवकरच कायदेशीर बाबींचा विचार करीत असून आम्ही आमच्या मेहनतीने बनविलेल्या उत्पादनांची अशी चुकीच्या प्रकारे केलेली बदनामी कधी सहन करणार नाही असे के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि. कंपनीतर्फे सांगण्यात आले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article