
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; 1 इसमाकडून तलवारी व कोयते जप्त
Saturday, April 2, 2022
Edit
बारामती:- गुढी पाडव्याच्या अनुषंगाने शिवनगर माळेगाव बु. येथे गस्त करत असताना स पो नि श्री राहुल घुगे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मुलगा नामे तेजस खंडाळे राहणार लकडे नगर माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे हा झेलसिंग रोड माळेगाव येथे 3,4 तलवारी व कोयते घेवुन थांबला आहे. अशी माहिती मिळताच पंचासमक्ष त्यास झेलसिंग रोड माळेगाव येथे ताब्यात घेवुन झडती घेतली असता त्याचे ताब्यांत 2 मोठे कोयते व 1 लोखंडी तलवार मिळून आली आहे. सदर आरोपीस कारवाई कामी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलिस निरीक्षक श्री महेश ढवान यांचे मार्गद्शनाखाली स पो नि श्री राहुल घुगे, पो ना राजेंद्र काळे, दत्तात्रय चांदणे, पो शि संतोष मखरे, होमगार्ड सकट, भंडलकर, किशोर धनगर यांनी केली आहे.