-->
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप

  वडगाव निंबाळकर प्रतिनिधी@ सुनील जाधव
बारामती: वडगाव निंबाळकर येथे आज सुधीर जाधव व भूषण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंगरे परांडे मळा येथील  विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक राजेश्वरराजे राजेनिंबाळकर यांनी उपस्थिती दाखवली. यावेळी युवा पिढी वाढदिवसानिमित्त पार्टी करणे, केक कापुन तोंडाला लावणे इत्यादी गोष्टी करत असतात परंतु हा फालतू खर्च न करता सामाजिक कार्य, विविध उपक्रम केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. यावेळी  शाळेचे शिक्षक डी. डी.संचिती सर, डी, व्ही.भोसले सर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व समस्त मित्र परिवाराकडून शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी राजेश्वर राजे मित्रपरिवार रेवणनाथ गायकवाड, अनिल जाधव,सचिन गायकवाड,विक्रम भापकर,आकाश गायकवाड,वैभव दुर्गाडे,ओमकार दरेकर, अक्षय पवार, सुनील जाधव, सुधीर जाधव,प्रतिक गायकवाड मित्र परिवार उपस्थित होता. तसेच शाळेत लागणाऱ्या वस्तूंची उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले व येणाऱ्या काळात वाढदिवसाच्या वेळी होणारा अनावश्यक खर्च टाळून विविध नवनवीन उपक्रम राबवण्यात येतील. वाढदिवसा दिवशी सुधीर व भूषण ने समाजाला छानचं संदेश देत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article