-->
एकीकडे तमाशाचा फड रंगलाय तर दुसरीकडे रोलर चाललाय.....       अजितदादा उद्या गावात येणार म्हटल्यावर कामं तर पूर्ण झालीच पाहिजेत

एकीकडे तमाशाचा फड रंगलाय तर दुसरीकडे रोलर चाललाय..... अजितदादा उद्या गावात येणार म्हटल्यावर कामं तर पूर्ण झालीच पाहिजेत

कोऱ्हाळे खुर्द - गेली २ वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे गावोगावच्या यात्रा जत्रा बंद होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गावोगावी यात्रा जोमात सुरू आहेत. रात्री उशिरा पर्यंत गावात तमाशाचे फड रंगत आहेत. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावात भैरवनाथ यात्रा अगदी उत्साहात सुरू आहे. गावातील कार्यक्षम सरपंच गोरख खोमणे यांनी लोक भावना लक्षात घेत अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले आहेत. 
             शनिवार रात्री सुनिता राणी बारामतीकर हा लोकनाट्य तमाशा ऐन रंगात आला होता. पंचक्रोशीतील अनेक कला रसिक तमाशाला हजार होते. मात्र दुसरीकडे तमाशा फडाजवळच रोलर ची भिर भिर ऐकू येत होती..याचे कारण होते उद्याचा अजित पवार यांचा दौरा..
                गावातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोऱ्हाळे खुर्द येथे येणार आहेत. दादांची तीक्ष्ण नजर उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत रस्ता नीटनेटका करायचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. 

           दादांच्या स्वागताला कुठलीच कमी राहू नये याची काळजी स्वतः सरपंच गोरख खोमणे घेत होते. ऐरवी गोरख खोमणे कार्यक्रम शांततेत व्हावा म्हणून कार्यक्रम स्थळी ठाण मांडून बसतात मात्र रात्री सरपंच गावातील सर्व व्यवस्था ठीक करण्यात रात्री उशिरा पर्यंत व्यस्त होते. शेवटी बारामतीकर व दादांचे वेगळे नाते आहे याची प्रचिती यामुळे आली.
          उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे, सोमेश्वरच्या संचालिका प्रणिता खोमणे, गावचे सरपंच गोरख खोमणे यांच्या नेतृत्वाखाली गावाचा जोमाने विकास सुरू आहे. उद्या सकाळी दादा गावातील विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन करण्यासाठी गावात येणार आहेत.

Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article