
चोरीतील बुलेट मोटार सायकलसह एका आरोपीला अटक; वडगाव निंबाळकर पोलीसांची नाकाबंदी दरम्यान कामगिरी
Monday, April 18, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हदद्दीत दिनांक १७/०४/२०२२ रोजी १६.०० वा मौजे वडगाव निबाळकर ता. बारामती जि.पुणे गावचे हदद्दीत निरा बारामती रोडवर पोलीस स्टेशन समोर सपोनि श्री लांडे सो यांचे आदेशाने सफौ थोपटे, पोहवा / ९३८ फणसे पोकॉ / साळुंके असे नाकाबंदी करून वाहने चेक करत असताना एक इसम त्याचे ताब्यातील बुलेट मोटार सायकलवरून बारामती बाज़ुकडुन निरा बाजुकडे जात असतांना पोलीसांनी त्यांस थांबवून त्याचे नांव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राम लक्ष्मण कुऱ्हाडे वय ३० मुळ रा. मानगुत्ती ता. हुकेरी जि. बेळगाव राज्य कर्नाटक हल्ली रा. धानोरे ता. शिरूर जि.पुणे असे असल्याचे सांगितले त्याचेकडे असलेल्या बुलेट मोटारसायकल नं एमएच १२ पीएल ७६७६ हीचे बाबत त्याचे कडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिल्याने त्याचेकडे अधिक व सखोल चौकशी केली असता त्याने सदरची, मोटार सायकल ही शिकापुर पोलीस स्टेशनचे हददीतुन पांढरेवस्ती धानोरे ता. शिरूर जि. पुणे येथुन चोरी करून आणले असलेबाबत सांगितलेने आम्ही तत्काळ सदर इसम व दुचाकी ताब्यात घेवून शिकापुर पोलीस स्टेशन येथे चौकशी केली असता शिकापुर पोलीस स्टेशन येथे बुलेट मोटारसायकल नं एमएच १२ पीएल ७६७६ किमंत ८०००० / - रूपये ही चोरीस गेलेबाबत गुरनं ३७८/२०२२ भादविक ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल असलेचे सांगितले. त्यामुळे सदर आरोपीस मोटार सायकल सह शिकापुर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अभिनव देशमुख साो. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री. मिलींद मोहीते साो. अमर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री. गणेश इंगळे साो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, व श्री अशोक शेळके सो. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सोमनाथ लांडे, पोसई सलीम शेख, सहा फौजदार थोपटे, पोलीस हवालदार महेंद्र फणसे पोशि/महादेव साळुंखे यांनी केलेली आहे.