
डी.पी जगताप यांच्या पॅनेलचा धुरळा केलेल्या संस्थेच्या चेअरमनपदी गोलांडे तर व्हा. चेअरमनपदी कांबळे
Wednesday, April 20, 2022
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर डी.पी जगताप यांच्या पॅनलचा धुरळा केलेल्या स्वयंभूनगर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विजय गोलांडे तर व्हा चेअरमन पदी कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
संस्थेचे संस्थापक डी.पी जगताप विरुद्ध खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांच्या पॅनेलमध्ये चुरशीच्या वातावरणात निवडणूक पार पडली. दुर्योधन भापकर यांनी 13 जागा जिंकत डी.पी जगताप यांच्या पॅनेलचा धुरळा केला.
आज सहाय्यक निबंधक कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची बैठक पार पडली. दोन्ही पदाकरिता प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने चेअरमनपदी विजय गोलांडे तर व्हा चेअरमनपदी कांबळे बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोबडे यांनी जाहीर केले.
यावेळी दुर्योधन भापकर राहुल भापकर, मुनीर तांबोळी, नारायण भापकर, सचिव मारुती घाडगे, मनोहर भापकर, अंकुश जगताप, विजय बारवकर, दादा चोपडे उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सहाय्यक निबंधक मिलिंद टाकसाळे यांनी सत्कार केला. मिलिंद टाकसाळे, दुर्योधन भापकर, मुनीर तांबोळी यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.