
लाटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उमेश साळुंखे बिनविरोध
Wednesday, April 20, 2022
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - बारामती तालुक्यातील लाटे ग्रामपंचायतीच्या सरपंच शीतल खलाटे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेवर उमेश महादेव साळुंखे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सौ प्रमिला लोखंडे यांनी श्री उमेश महादेव साळुंखे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड केली.
या कार्यक्रमास ग्राम विकास अधिकारी विजय चव्हाण आणि तलाठी भाऊसाहेब वव्हाळ उपस्थित होते.
सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक नानासो खलाटे व सचिन खलाटे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते