-->
व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याने बारामतीतील ४ तर परभणीच्या एका सावकारांवर गुन्हा दाखल

व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याने बारामतीतील ४ तर परभणीच्या एका सावकारांवर गुन्हा दाखल

बारामती:- तक्रारदार महिलेचे तिचे पती बबन सातपुते राहणार रिया आपारमेंट भिगवन रोड बारामती यांनी 2021 मध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बायोमास ब्रिक्वेट्स बनवण्याची कंपनी सुरू केली कंपनी सुरू करताना तिच्या पतीने संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी राहणार बारामती व अळणुरे साहेब परभणी या सावकारांकडून दर महिना पाच टक्के व्याजाने एक करोड नऊ लाख रुपये घेतले होते. या सर्वांची बरीचशी रक्कम व्याजासहित कारखाना चालू असताना परत केली आहे. परंतु दुर्दैवाने त्यांच्या कारखान्याला तीन मे 2021 ला आग लागली व त्यामध्ये त्यांचे नुकसान झाले. 
                त्यामुळे बाकीची रक्कम ते परत देऊ शकले नाही. त्यानंतर वरील सर्व सावकारांनी त्यांना व्याजा साठी त्रास देण्यास सुरुवात केली इन्शुरन्स मिळाल्यानंतर राहिलेली रक्कम देतो अशी विनंती करून सुद्धा ते त्याला त्रास देत आहेत. त्यांच्या त्रासापोटी 17 एप्रिल रोजी घरातून निघून गेलेले आहेत. ते घरातून निघून गेलेले असताना सुद्धा यातील आरोपी पोपट थोरात हा तक्रारदार महिला घरात असताना बूट घालून तक्रारदार महिलेच्या घरात जाऊन तिला व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून व्याजा साठी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सदर महिलेने शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली. 
             तक्रारदार महिलेचे पती अद्याप घरी आलेले नाही. सदर बाबत पोलिसांनी खातरजमा करून वरील सर्व आरोपींच्या विरोधात सावकारी अधिनियम कलम 39 व चाळीस प्रमाणे तसेच भादवि कलम 452 354 506 504 प्रमाणे गुन्हे दाखल करून यातील आरोपी पोपट थोरात व संजय बोरकर यांना तात्काळ अटक केली असून काल दिनांक 20 चार 22 रोजी पासून चार दिवस वरील दोघांना पोलीस कोठडी रिमांड माननीय न्यायालय  वागदुळे यांनी मंजूर केले आहे. सदर बाबत सरकारी अभियोक्ता किरण सोनवणे यांनी पोलिसांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे पोलीस उपनिरीक्षक घोडके तसेच पोलीस नाईक  संजय जाधव पोलीस नाईक दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर शिंदे इंगोले यांच्या मदतीने करत आहेत. यापुढे मलाही सावकारीचा त्रास होत असेल त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करावी तक्रारीची खातरजमा करून कारवाई केली जाईल कुणीही बेकायदेशीर सावकारांची भीती बाळगू नये. फक्त तक्रार ची खातरजमा केली जाईल नंतरच दाखल होईल.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article