
सुपे-लोणीपाटी रस्त्याच्या कडेला उभा केलेला, पुढचे दोन्ही टायर जळलेला ४.५ लाखांचा १२ चाकी ट्रकच चोरट्यानी केला लंपास
Sunday, April 24, 2022
Edit
सुपे- साईनाम सुखदेव बुमनर वय-34 वर्ष धंदा-ड्रायव्हर, रा कानडगाव, ता. चांदवड नि. नाशिक यांचा ४.५ लाख रुपयांचा एक टाटा कंपणीची 3118 मॉडेलची लाल पांढरे रंगाची ट्रक एम एच 18 ए.ए 8281 हा साईप्रसाद हेडलाईन्स टान्सपोर्टला कोंबडी खादय भरून दिनांक 6/2/2022 रोजी बारामती येथे पाठविला होता त्यानंतर दि. 16/2/2022 रोजी सकाळी 09.53 वा सुमारास मला ट्रक चालक -राहुल नागरे याने फोन करून कळविले होते की सुपे लोणीपाठी रोडने जाताना काळखैरवाडी ता. बारामती येथे ट्रकचे कंबॉनमध्ये शॉटसकीट होवून ट्रकला आग लागून ट्रकचे व त्यामधील मालाचे नुकसान झालेले आहे. असे कळविले होते तेव्हा आम्ही गाडीतील शिल्लक माल त्या ठिकाणी जावून घेवून आलो होतो त्यानंतर चालक राहुल अंबादास नागरे याचेवर वडगाव नबाळकर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबत चालक राहुल अंबादास नांगरे यांचेवर वडगाव निंबाळकर पो.स्टे येथे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा ट्रकचे पुढचे टायर जळाल्यामुळे हलू शकत नसल्याने त्याच ठिकाणी लावून होता. परंतु तो ट्रक सदर ठिकाणावरून कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीच्या संहमती शिवाय मुददाम लबाडीने चोरून नेला आहे.
अज्ञात चोरटया विरुद्ध कायदेशिर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पो ना धुमाळ करीत आहेत.