
प्रेमप्रकरणातून झाला कोयता हल्ला; मुरूम येथील तिघांवर वडगांव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल
Monday, April 25, 2022
Edit
मुरूम ता बारामती येथे शनिवार दि २४ रोजी मध्यरात्री झालेल्या कोयता हल्ला प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत युवराज नारायण सोनवणे रा मुरुम सिध्दार्थनगर ता. बारामती जि.पुणे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी वैभव दिपक खरात, हर्षद थोरात व सनी खुडे सर्व रा. मुरुम तळवणीनगर ता. बारामती जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २४ रोजी रात्री सव्वा एक वाजता विकासनगर येथे वाणेवाडी मुरूम रस्त्यावर यातील आरोपी मजकुर १ ते ३ यानी फिर्यादीचा मुलगा आदित्य युवराज सोनवणे याचे आरोपी नंबर १ याची बहिण हिच्याशी प्रेमसंबंध असल्याचे कारणावरून चिडून जावून यातील आरोपी १ ते ३ यानी संगनमत करून फिर्यादीचा मुलगा यास रोडवर आडवुन त्यास जीवे ठार मारणचे उद्देशाने कोयत्याने डोकीस चेहऱ्यावर दोन्ही हातावर पोटावर वार करून त्यास किरकोळ व गंभीर दुखापती करून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे हे करीत आहेत.