
लाटे येथील हरीबुवा संस्थेची निवडणूक बिनविरोध
Wednesday, April 20, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील लाटे येथील हरिबुवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.
संस्थेच्या १३ जागांकरिता अर्ज मागविण्यात आले होते परंतु १३ जागांसाठी १३ अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.
संस्थेच्या संचालक पदी सर्वसाधारण मधून सचिन खलाटे, अनिल खलाटे, अशोक खलाटे, शिवाजी ताकवले राजेंद्र खलाटे, दत्तात्रय खलाटे, हरिभाऊ साबळे, सादिक पठाण, अनु जाती जमाती मधून शिवाजी ननवरे, इतर मागास प्रवर्गातून संदीप वाघमारे, भ.ज.वि जाती मधून नामदेव कोळेकर, महिला प्रतिनिधी म्हणून देवता खलाटे व संगीता सुरळकर यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सोमेश्वरचे माजी संचालक नानासो खलाटे व सचिन खलाटे यांनी मार्गदर्शन केले.